सध्याचा काळ डिजिटल मिडीयाचा, युट्युब हे जगातील सर्वात मोठे डिजिटल माध्यम
सध्याचा काळ डिजिटल मिडीयाचा – पत्रकार तुकाराम गोडसे
प्रिंट व डिजिटल मिडिया सुसंवाद बैठक संपन्न
लोणी काळभोर प्रतिनिधी -प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य संघटनेची हवेली व दौंड तालुक्याची सुसंवाद बैठक लोणी काळभोर रामधरा येथील सात्विक व्हॅली रिसॉर्ट येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनेची आगामी काळातील ध्येयधोरणे, संघटनेच्या सभासदांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे, सभासदांकडून आलेल्या विविध सुचनांचा उहापोह करुन सर्व संमतीने नवीन कार्यक्रम आयोजित करणे, सभासद व पदाधिकारी यांच्या संमतीने उपस्थित प्रश्नांवर सखोल चर्चा झाली.
यावेळी संघटनेचे जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे यांच्या महाराष्ट्र खबर न्यूजला यूट्यूबचे सिल्वर बटन मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तुकाराम गोडसे यांनी यूट्यूब चॅनल सुरू करून चांगल्या पद्धतीने कसे चालवावे या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्ष सुनील जगताप,जिल्हाध्यक्ष बाप्पू काळभोर, सचिव संदीप बोडके,खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, चंद्रकांत दुंडे, जितेंद्र आव्हाळे, अमोल भोसले, रियाज शेख, अमोल अडागळे, गौरव कवडे तर दौंड तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी सचिव राहुलकुमार अवचट, कार्याध्यक्ष मनोजकुमार कांबळे, उपाध्यक्ष संदीप भालेराव, विलास कांबळे, मुख्य प्रतोद संतोष जगताप, संघटक मिलिंद शेंडगे, सदस्य सोनबा ढमे, नेताजी खराडे, सतीश गायकवाड उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्याचे समन्वयक महाराष्ट्र खबर न्यूजचे मुख्य संपादक तुकाराम गोडसे बैठकीमध्ये बोलताना म्हणाले सध्याचा काळ हा डिजिटल मिडीयाचा काळ आहे,2013 पासून पत्रकारिता करत आहे, त्यावेळी डिजिटल मीडियाची एवढी क्रेझ नव्हती पण जसा काळ बदलत गेला तसा डिजिटल मीडियामध्ये नवीन प्रणाली उदयास आली, आज तब्बल 10 वर्षांनंतर युट्युब च्या माध्यमातून अनेक लोकांच्या आपल्या आयुष्यात बदल झाला आहे, युट्युब हे जगातील सर्वात मोठे डिजिटल माध्यम म्हणून आज ओळखलं जातं त्या माध्यमातून आज करोडो लोक पैसा कमवत आहेत, डिजिटल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे तितकच महत्त्वाचा आहे, प्रत्येकाने डिजिटल मीडियात यावे आणि आपल्या कलेतून कौशल्य दाखवून जगासमोर वेगळं स्थान निर्माण करावे अस मत बोलताना व्यक्त केले.