लेक लाडकी योजनेचे 25000 शिवसेना मोफत अर्ज भरणार
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे नेतृत्वाखाली 650 बांधकाम कामगारांना भांडी वाटप,
सोलापूर प्रतिनिधी- दिलीप दंगाणे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून त्यासाठी करमाळ्यातून विधानसभेला शिवसेनेचा उमेदवार निवडून द्यावा
असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले.
लेक लाडकी योजने अंतर्गत अर्ज भरणे प्रारंभ व बांधकाम कामगार महिलांना भांडी वाटप आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती सुनील शेठ चोरडिया,
शिवसेना मुस्लिम आघाडी बीड जिल्हा समन्वयक सय्यद मन्सूर पटेल,
तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख संजय आप्पा शीलवंत,
शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे,
उपतालुकाप्रमुख सुनीता गोडगे,
जेऊर शहर प्रमुख माधव सूर्यवंशी,
युवासेना शहरप्रमुख जेऊर बाळासाहेब करचे,
तालुकाप्रमुख नवनाथ गुंड,
शाखाप्रमुख बाबासाहेब तोरणे, संजय जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की
तालुक्यातील गटातटाचे पुढारी केवळ ठेकेदार व आपल्या बगलबच्चांच्या हिताचे राजकारण करतात,
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार नाही, ना वेळ नाही
खऱ्या अर्थाने प्रत्येक प्रश्नाला धावून शिवसेना जाते,
वैद्यकीय मदत पासून शासकीय योजनेचा फायदा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत शिवसेना पोचून देते,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातील स्वार्थी लबाड पुढार्यांना ओळखा असे आव्हान केले.
करमाळा तालुक्यात 8500 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याची टार्गेट असून
ज्येष्ठ नागरिकांसाठी महिन्यात तीन हजार रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले असून त्याचे फॉर्म भरून घेतले जात आहेत
यावेळी महेशचिवटे यांनी गटात गटाच्या राजकारणावर कडाडून टीका केली
वाळू व्याजबट्टाच्या माध्यमातून राजकारण करणारे व शेतकऱ्याचे साखर कारखाना कारखाने बुडून राजकारण करणाऱ्यांना जनता कंटाळली आहे.
आत्ताच लोकांना विकासाचे राजकारण पाहिजे आहे विकासाचे राजकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करू शकतात, यामुळे एकनाथ शिंदे यांचा विचाराचा आमदार करमाळ्यातून विधानसभेत जाणार.
शिवसेनेने उमेदवारी दिली तर विधानसभा लढवणार असा दावा या कार्यक्रमात महेश चिवटे यांनी केला.
गेल्या 40 वर्षात करमाळातील उर्दू शाळेला वर्ग वाढीची मान्यता मिळाली नाही, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलाही धर्मभेद जातीभेद न करता करमाळातील उर्दू शाळेला वर्ग वाढ देऊन मान्यता दिली.
खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाला न्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतात, असा आमचा विश्वास असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण मुस्लिम समाज एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहणार असा दावा मुस्लिम समाजाचे नेते मन्सूर सय्यद पटेल यांनी या कार्यक्रमात केला.