Sunday, October 6, 2024
सामाजिक

मल्हारगडा वरील पुरातन पाण्याच्या टाक्यांची सफाई, सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम



चाळीसगाव प्रतिनिधी- अनिल राठोड

चाळीसगाव जवळील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेल्या मल्हारगडावरील पुरातन पाण्याच्या कोरीव दगडी टाक्यांची सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने मोहीम घेऊन त्यातील मोठमोठाले गवत गाळ दगड काढून साफसफाई स्वच्छता करण्यात आली, आता काही दिवसांनी पावसाळा सुरू होणार असल्याने या स्वच्छ केलेल्या टाक्यांमध्ये यावर्षी पडणाऱ्या पावसाचे चांगले पाणी साचेल तसेच यातील गाळ काढण्यात आल्याने पाण्याची क्षमता देखील वाढेल या उद्देशाने ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

Advertisement

पाण्याच्या साठ्यामुळे वर्षभर या परिसरातील वन्यप्राणी तसेच किल्ल्यावर येणाऱ्या दुर्गप्रेमी आणि पर्यटकांना पिण्यासाठी येथे मुबलक पाणी उपलब्ध होते, म्हणूनच हा उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने राबविण्यात आला.

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, ॲड. रणजीत पाटील, मोहीम प्रमूख सचिन पाटील, गजानन मोरे, जितेंद्र वाघ, योगेश शेळके, रवींद्र दुशिंग, गणेश (पप्पू) पाटील, नाना चौधरी, राहूल पवार, संभाजी पाटील, भाऊसाहेब पाटील, विजय कदम, विलास चव्हाण, वाल्मीक पाटील, सचिन देवरे, बबलू चव्हाण, अभिषेक गुंजाळ, मोहन भोळे, ललित चौधरी, दर्शन चौधरी, नाना अहिरे, मयूर भागवत, नृतेश भागवत, आयुष माळी, भानुदास बोरसे, शेखर आगोणे, सागर रोजेकर, गिरीश भामरे, आदींनी आपला सहभाग नोंदवला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!