कला जीवनात आनंद निर्माण करते – नयना आपटे
प्रतिनिधी:गोरख कामठे (पश्चिम महाराष्ट्र संपादक)
बुधवार दि.3 एप्रिल रोजी पुणे जिल्हयातील कलाशिक्षकांची कार्यशाळा पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाच्या वतीने व डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अल्पायआर्ट यांच्या सहकार्याने आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेजच्या सभागृहात आयोजित केली होती. या कार्यशाळेला जिल्हयातून ५०० कलाशिक्षक उपस्थित होते. या कार्यशाळेत सिनेमा ‘ नाटय क्षेत्रात भरीव कामगीरी केल्याबददल प्रसिद्ध सिने नाटय अभिनेत्री नयना आपटे यांना कलाभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना नयना आपटे यांनी जीवनातील कलेचे महत्व पटवून दिले,एका कलेमुळे जीवनात किती आनंद होतो ‘ नैराश्य लोप पावते या साठी कला महत्वाची आहे,असे सांगितले या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी,डी. वाय. पाटील संस्थेचे रिअर अँडमिनरल अमित विक्रम,मा.प्रभात रंजन , कॉलेज चे प्राचार्य जयप्रकाश कलवले, राज्य कला संघटनेचे उपाध्यक्ष किरण सरोदे , आदि मान्यवर उपस्थित होते . कार्यकमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी केले . या कार्यशाळेत राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे यांनी लिहिलेले नाटयदरबार या बाल नाटय पुस्तकाचे प्रकाशन अभिनेत्री नयना आपटे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबददल खानहुसेन गाजेखान यांना कलामहर्षि तर कला विषयतज्ञ मोहन भोजापुरे, चित्रकार चंद्रकांत जोशी, नाटय समिक्षक शंकरराव घोरपडे यांना कलागौरव पुरस्काराने सन्माननीत करण्यात आले.
कार्यशाळेत “नविन शैक्षणिक धोरणात कलाविषयाचे स्थान” या विषयावर प्रा. मोहन भोजापुरे यांनी व्याख्यान दिले तर व्यक्तिचित्राचे स्प्रे पेंटिग प्रात्यक्षिक सुप्रसिद्ध चित्रकार मिलिंद शिंपी यांनी केले .
राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे यांनी संघटनेच्या वतीने शासन दरबारी कलाशिकांच्या मागण्या मांडून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करून त्यात यश मिळाल्याचे सांगितले, उरलेल्या मागण्यांसाठी संघटना प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
समारोप प्रसंगी पुणे जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील दोन गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक भोसले यांनी केले तर आभार जिल्हाउपाध्यक्ष श्याम साठे यांनी मानले.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परीषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर व डि. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच पुणे जिल्हा कला शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मिलींद शेलार, सचिव वाहिद खान, सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.